Wednesday 9 November 2016

ब्लॉगवाचण्यासाठीचे उपनेत्र



नमस्कार महाराष्ट्र

मी महाराष्ट्राच्या  उपराजधानीत राहणारा एक उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलगा
लेखन आणि विचार यासाठी आपली भूमी जाणली जातेच मग मी यातून वेगळा कसा राहणार
सध्या मी बी टेकच्या शेवटच्या वर्षाला आहे नागपुरातील आणि देशातील्सुद्धा एका प्रतिष्ठित केमिकॅल इंगीनीरिंग कॉलेज लक्ष्मिनारायण institute of technology चा मी विद्यार्थी आहे.

शालेय शिक्षण हडस हायस्कूल मधून घेतलेले आहे हडस हि नागपुरातील नामवंत शाळांपैकी एक शाळा आहे
प्रत्येक सामान्य मराठी मुलाप्रमाणेच  इतिहास राजकारण चालू घडामोडी यांच्या संपर्कात असण्याचा छंद आहेच .

आजवर मी जेजे पहिले अनुभवले निरीक्षण केले तेते सर्व येथे विदित करण्यात येईल
पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व यापेक्षा महाराष्ट्रीयत्व नावाची विशेष विचारशैली मी निर्माण करून  तिच्या आधारे   आसेतुहिमचल पर्यंतच्या सर्व गोष्टी मी बघत असतो.

मी भगव्याला मानणारा एक मावळा आहे .हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांना मानणारा एक स्वाभिमानी आणि खरा क्षत्रीय देखील आहे .

मला असे वाटते कि काहीही बोलताना लिहितांना समुदाय अथवा जात धर्म याविषयी आपण काही हा शब्द वापरावा म्हणजे आपले म्हणणे योग्यरीत्या मांडता येईल.म्हणूनच या ब्लोगचे नाव काही मनसोक्त असे ठेवले आहे

माझी कुठलीही पोस्ट वाचण्याआधी माझ्या या भूमिकेच्या चष्म्यातून म्हणजेच ज्याला संस्कृतमध्ये उपनेत्र म्हणतात ते आपणाला बुद्धीच्या डोळ्यांवर धारण करावे लागणार आहे .
हि उपनेत्राची  पहिलीवहिली पोस्ट सर्वांना अर्पित  !